“अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन…” रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला

Rohit Shetty |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Rohit Shetty |  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्याने त्यांच्या कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याचदरम्यान आता दिग्दर्शक रोहित शेट्टी याने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत पापाराझींवर संताप व्यक्त केला.

रोहित शेट्टी ‘बिग बॉस १९’ च्या सेटवर गेला असता, फोटोग्राफर्सना पाहताच रोहितने त्यांच्याशी संवाद साधला. त्याचदरम्यान रोहित शेट्टी पापाराझींना, “अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन गेलात की नाही?” असा सवाल करतो. यावर उपस्थित एका फोटोग्राफरने त्यांना सांगितले की, “आता आम्ही त्यांच्या घराबाहेर थांबत नाही.” रोहित शेट्टीच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आरोग्याची चिंता स्पष्टपणे दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दोन दिवसांपूर्वीच सनी देओलने फोटोग्राफर्सवर संताप व्यक्त केला होता. घराबाहेर फोटोग्राफर्सची गर्दी पाहून सनी देओल खूपच अस्वस्थ झाला आणि त्याने हात जोडून त्यांना विनंती केली, “तुमच्या घरात आई-वडील आहेत. तुमची मुलं आहेत, तुम्हाला लाज नाही वाटत?” त्याचा व्हिडिओही सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. सनी देओलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील पापाराझीवर निशाणा साधला होता. Rohit Shetty |

हेही वाचा: 

“बिहारमध्ये १० हजार रुपयांच्या योजनेमुळे फायदा, निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे…”; शरद पवारांची प्रतिक्रिया

The post “अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन…” रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!