Ambegaon News : वनविभागाला मोठे यश! चास-गणेशवाडी परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर सापडला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील चास-गणेशवाडी येथे गुरुवार, दि.१३ रोजी सकाळी पाच वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. बाळासाहेब दशरथ बारवे यांच्या शेतात वनविभागाने काही दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तत्परतेने कारवाई करून बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडले,अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

या मोहिमेत वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक रईस मोमीन तसेच शीघ्र कृती दलाचे सर्व सदस्य सहभागी होते. पकडलेला बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. बिबट्याला पुढील उपचार व तपासणीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर आहे का, यासाठी देखरेख सुरू करण्यात आली आहे.वनविभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

The post Ambegaon News : वनविभागाला मोठे यश! चास-गणेशवाडी परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर सापडला appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!