अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी मोठी कमाई

De De Pyaar De 2 Collection |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

De De Pyaar De 2 Collection |  अभिनेता अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. चित्रपटातील अजय देवगणचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच अजय आणि रकुलची केमिस्ट्री खूपच भन्नाट आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहच्या ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘दे दे प्यार दे 2’ चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा सीक्वल आहे. हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. ‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट अंशुल शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह झळकली आहे.  De De Pyaar De 2 Collection |

‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट अंशुल शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंहसह आर माधवन, गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकारही पाहायला मिळत आहेत.  De De Pyaar De 2 Collection |

हेही वाचा: 

प्रेमासाठी काहीपण! धनुष अन् क्रितीचा ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

The post अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी मोठी कमाई appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!