Ajit Pawar : बारामतीचा नगराध्यक्ष कोण? जय पवारांच्या नावाला पूर्णविराम, अजित पवार म्हणाले..

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत आज खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आज अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषदेवेळी बोलताना याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.जय पवार हे निवडणूक लढणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी जय पवार यांच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे.

बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथे मुलाखती घेतल्या जातील त्यानंतर होणार्‍या मेळाव्यात आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्ष पदासाठी सर्व समावेशक चेहर्‍याला संधी देणार असल्याची संकेत यावेळी त्यांनी दिले.बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पदासाठी जय पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जय पवार यांच्या नावाची मागणी होत होती.

त्याला अजित पवार यांनी आज स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला. गुरुवारी (दि. 13) सकाळी सात वाजता कसबा येथील राष्ट्रवादी भवन येथे सकाळी सात वाजता नगराध्यक्ष पदाच्या मुलाखती सुरू होतील. पक्षाकडे मागणी केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतली जातील. दुपारी एक नंतर होणार्‍या मेळाव्यात याबाबत माझे मत व्यक्त करेल, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांना उत्तर देता आले नाहीत..
आजही माझ्याकडे नगराध्यक्ष पदासाठी काही इच्छुक आले होते. मग मी त्यांना विकासाच्या तसेच सामाजिक बाबतीत काही प्रश्न विचारले पण त्यांना त्याची उत्तरे देता आले नाहीत.

सर्व समावेशक चेहर्‍याला पसंती..
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये त्याच्या सामाजिक योगदानाची दखल घेतली जाईल. विकास कामांसाठी दिलेल्या वेळ, बारामती नगर परिषदेबाबत त्याचे व्हिजन, तसेच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा चेहरा असावा अशा उमेदवाराची निवड होण्याची शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली.

The post Ajit Pawar : बारामतीचा नगराध्यक्ष कोण? जय पवारांच्या नावाला पूर्णविराम, अजित पवार म्हणाले.. appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!