Ajit Pawar: चुकीला माफी नाही, अजितदादांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शिंदेसेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी, महायुतीत ठिणगी?

Ajit Pawar: चुकीला माफी नाही, अजितदादांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शिंदेसेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी, महायुतीत ठिणगी?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Pune Land Scam : पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं 40 हेक्टर जागेच्या खरेदीविरोदात सह जिल्हा निंबधक कवर्ग 1 यांनी बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यापाठोपाठ कृषी विभागाची 5 एकर जमीन घोटाळा समोर आला. या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी आणि त्यातील सहभागीदारांची नावं समोर आली आहेत. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के वाटा आहे. 1 टक्के वाटा असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर शीतल तेजवानीसह इतर आरोपींवरही कार्यवाही करण्यात आलेली आहे. शीतल फरार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंढवा जमीन जमीन गैरव्यवहारप्रकरणात SIT

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विशेष चौकशी समिती(SIT) गठीत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंनी एसआयटी नेमली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावे असलेला जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. या एसआयटीमध्ये 8 अधिकारी असतील अशी माहिती समोर येत आहे. ही समिती आता या सर्व प्रकरणाची चौकशी करेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीचाअहवाल एका महिन्यात समोर येणार असल्याचे सांगितले.

पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा

तर पार्थ पवार यांच्या कंपनीकडून झालेल्या जमीन गैर व्यवहारप्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण तापले आहे. उद्धव सेना, काँग्रेसने याप्रकरणात चौकशीची आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. तर आता शिंदे सेनेचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सुद्धा या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी जैन बोर्डिंग प्रकरण धसास लावल्यानंतर याप्रकरणी यंत्रणांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.

कोंढवा जमीन व्यवहारात सगळी सिस्टीम चुकली आहे, गुन्हा दाखल झालाय मात्र पार्थ पवारांना का ठेवलेय हे कळलं नाही, जैन बोर्डिंग आणि हा जमीन व्यवहार दोन्ही कांड आहेत.या व्यवहारात पोलीस ऍकशन झाली मग जैन बोर्डिंगमध्ये कां नाही, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं का? असा सवाल धंगेकरांनी केला. दादाच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दादांचं कोणी ऐकत नाही

चुकीला माफी नाही.पार्थ पवार चुकलाय, चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं माघारी पैसे भरा.जैन बोर्डिंग आणि कोंढवा जमीन गैरव्यवहार दोन्हीची ED कडून चौकशी केली पाहिजे. वडिलांची पॉवर मुलगा वापरतो यात काहीच प्रश्न नाही.यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे. दादांचं कोण ऐकत नाही, पक्ष्यामध्ये देखील कोण ऐकत नाही आणि मूल मोठी झालीत ती देखील ऐकत नाहीत, असा टोलाही धंगेकरांनी अजितदादांना लगावला. धर्मादाय आयुक्तांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!