एकनाथ शिंदेंना पुन्हा मोठा धक्का, नाराजी भोवली, शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी

एकनाथ शिंदेंना पुन्हा मोठा धक्का, नाराजी भोवली, शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.  येत्या दोन डिसेंबरला राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर तीन तारखेला मतमोजणी होणार. दरम्यान आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांना उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरक करावी लागत असल्याचं चित्र आहे. इछुक उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली नाही तर तो इतर पक्षात जाऊ शकतो, त्याचा फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो अशी भीती सर्वच पक्षांना आहे, त्यामुळेच ही निवडणूक अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इगतपुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलं आहे.  युवा सेन तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्याने हे पदाधिकारी नाराज आहेत.

उमेदवारी जाहीर करताना पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विचार झाला नाही.  ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली.  आम्ही दोन वर्षांपासून पक्ष उभारतोय, मात्र यांनी ऐनवेळी पक्षाच्या हिताचे राजकारण न करता स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांवर करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार यातील काही जणांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देखील देण्यात आली आहे.  दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे पक्षप्रवेश सर्वच पक्षांसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरत आहेत. नाराज इच्छुकांची समज काढताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मात्र तारेवरची कसरत सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

 

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!