Bihar Election : “RJD 25 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही,” ‘या’ नेत्याची भविष्यवाणी खरी ठरली

Madan Shah
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (RJD) तिकीट नाकारल्यानंतर पक्षाचे नेते मदन शाह यांनी कपडे फाडून घेतले होते. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी मदन शाह यांनी पक्षाच्या पराभवामुळे दु:ख होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “पक्षाचा पराभव झाला हे पाहून मला वाईट वाटले, पण देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. यावेळी तिकीट वाटपाबाबत लालूजींशी सल्लामसलत करण्यात आले नव्हते.”

‘शाप’ दिला होता: RJD २५ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही
मदन शाह यांनी निवडणुकीपूर्वी ‘शाप’ दिला होता की, RJD 25 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. निकालानंतर त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. महाआघाडीला एकूण ३५ जागा मिळाल्या, तर RJDला फक्त 25 जागांवर विजय मिळाला.निवडणुकीपूर्वीच्या घटनेचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “त्यावेळी खूप दु:ख होते, निराश होऊन मी स्वतःचे कपडे फाडले होते.” तिकीटासाठी २.७ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर ते म्हणाले, “ही मागणी थेट मला करण्यात आली नव्हती.”

बिहार निवडणुकीत NDAचा दणदणीत विजय
भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या.

या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.

The post Bihar Election : “RJD 25 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही,” ‘या’ नेत्याची भविष्यवाणी खरी ठरली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!