… म्हणून बिहार निवडणुकीत झाला काँग्रेसचा पराभव; फडणवीसांनी सांगितलं कारण?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोग किंवा न्यायालयांना कोणतेही पुरावे सादर न करता मतचोरी आणि मतदानातील अनियमिततेबाबत कॉंग्रेस पक्षाने केलेले आरोप निवडणूकीत त्यांच्याच पराभवाला आणखी कारणीभूत असल्‍याचे म्‍हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्‍यांनी बिहार निवडणुकीत विरोधी पक्षाला मिळालेल्या अपयशावरून निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, काँग्रेसने जनतेशी पुन्हा संपर्क साधावा आणि त्यांचे राजकीय भविष्य बदलण्यासाठी जनतेशी संबंधित मुद्दे प्रामाणिकपणे मांडावेत. काँग्रेसने निराधार आरोपांवर अवलंबून राहणे थांबवावे. काँग्रेस सातत्‍याने मत चोरी आणि ईव्हीएमसारखे मुद्दे उपस्थित करत आहे. परंतु जेव्हा न्यायालय किंवा निवडणूक आयोग पुरावे मागते तेव्हा ते देत नाहीत. जर त्यांनी त्यांचा दृष्टिकोन सुधारला नाही, तर येत्या स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना असाच पराभव सहन करावा लागेल, असेही ते म्हणाले.

संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत आहे. देशातील जनता विरोधी पक्षांच्या बनावट कथनांना थेट उत्तर देत आहे, असे त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयाबद्दल बोलताना म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पाईपलाईन योजनेबाबत ते म्हणाले, आम्ही मराठवाडा प्रदेशात पाणी पाईपलाईन योजनेसह व्यापक विकास कामे हाती घेतली आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारने हा महत्त्वाचा प्रकल्प रखडवला होता. पण आता महानगरपालिका ८०० कोटी रुपयांचा राज्‍य सरकारने खर्च भरण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

The post … म्हणून बिहार निवडणुकीत झाला काँग्रेसचा पराभव; फडणवीसांनी सांगितलं कारण? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!