Bangladesh : बांगलादेशातील सुरक्षा व्यवस्था वाढवली; शेख हसीना यांच्याविरोधातील खटल्याची उद्या सुनावणी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bangladesh – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विशेष न्यायाधिकरणामध्ये दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी उद्या (सोमवारी) होणार असून यामुळे बांगलादेशातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कायदा राबवणाऱ्या संस्थांनी बंदोबस्त वाढवला असल्याचे गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी सांगितले.

शेख हसीना यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाच्या बांगलादेशातील न्यायाधिकरणामध्ये मानवतावादी गुन्ह्यांशी संबंधित अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. हसीना यांच्याबरोबर तत्कालिन गृहमंत्री असादुझ्झमान खान कमाल आणि तत्कालिन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्लाह अल-मामून यांनाही या खटल्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.

त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, छळ आणि अन्य मानवताविरोधी गुन्ह्यांचे आरोप आहेत. यातील हसीना आणि कमाल यांच्यावर त्यांच्या अनुपस्थितीतच खटला चालवला गेला. न्यायालयाने त्यांना फरार गुन्हेगार घोषित केले आहे. मामून माफीचे साक्षीदार झाले असून त्यांनी कबुलीजबाब दिला आहे. या खटल्यांची सुनावणी सोमवारी होणार आहे.

गेल्या वर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या जुलै उठावादरम्यानच्या हिंसाचारात १,४०० जण ठार झाले. हसीना यांनी आंदोलन चिरडण्यासाठी या हत्या घडवल्याचे संयुक्त राष्ट्राच्या हक्कविषयक संस्थेने म्हटले आहे. हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुख्य सरकारी वकिलांनी केली आहे. मात्र हसीना यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.

आवामी लीगचे ढाका लॉकडाऊन आंदोलन
शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने १७ नोव्हेंबर रोजी ढाका लॉकडान आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाचे बांगलादेशातील न्यायाधिकरण म्हणजे आपल्या राजकीय विरोधकांनी चालवलेले कांगारू कोर्ट असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. हसीना यांच्यावर लोकनियुक्त नसलेल्या हंगामी शासनाकडून आकसाने कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे विदेशी कायदेतज्ज्ञांनी म्हटले आहे.

खटल्याच्या कारवाईविरोधात आवामी लीगने हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच न्यायालयाचे बांगलादेशातील न्यायाधिकरण शेख हसीना यांनीच १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धातील अत्याचारांच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी स्थापन केले होते.

The post Bangladesh : बांगलादेशातील सुरक्षा व्यवस्था वाढवली; शेख हसीना यांच्याविरोधातील खटल्याची उद्या सुनावणी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!