मोठी बातमी! पहिल्यांदाच असं घडणार? शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! पहिल्यांदाच असं घडणार? शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात खळबळ
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे, राज्यातील एकूण परिस्थिती पहाता या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत, कारण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर लगेचच राज्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का याबाबत मोठी उत्सुकता होती, मात्र अनेक ठिकाणी या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाणार असल्याचं समोर आलं आहे, तसेच अनेक ठिकाणी स्थानिक राजकारण लक्षात घेऊन अनेक पक्षांनी युती आणि आघाडीबाबतचा निर्णय घेतला आहे.

या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षासाठी डोकेदुखी ठरलेला विषय म्हणजे पक्षांतर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच पक्षांतराला वेग आला आहे, इच्छूक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालं आहे की, पक्षाला योग्य उमेदवारही मिळत नसल्याचं चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुक्ताईनगरच्या निवडणुकीतून  खडसेंनी माघार घेतली आहे.  मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला अनेक हादरे दिले आहेत.   खडसेंच्या समर्थकांचे आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत, यावर प्रतिक्रिया देताना आता खडसे यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागात असल्याने आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या चार-पाच जागांवर लढविणार आहोत,  अथवा कदाचित निवडणूक लढविणार नाहीत अशी मोठी घोषणा एकनाथ खडसे यांनी रविवारी केली, ते भुसावळमध्ये बोलत होते.  उमेदवार मिळत नसल्यानं खडसे यांनी अशी घोषणा केली का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.  दरम्यान त्यामुळे आता खडसे यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट ही निवडणूक लढवणार का? की माघार घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!