
Pakistan – पाकिस्तानमधील फटाक्यांच्या बेकायदेशीर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान ७ जण ठार झाले आहेत आणि इतर काही जण जखमी झाले आहेत. हा स्फोट सिंध प्रांतातल्या हैदराबाद जिल्ह्यात लतिफाबाद भागातल्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये शनिवारी रात्री झाला, असे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले. लघारी गोथ नदीच्या किनाऱ्यावरील एका घरामध्ये परवाना न घेता हा फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. तेथे हा स्फोट झाला.
स्फोटानंतर घराचा एक मोठा भाग कोसळला. आतापर्यंत ७ मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्फोटाचे नेमके कारण समजू शकेल, अससे बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितले.
शेजारच्या घराची भिंत देखील कोसळली आहे. तेथे काम करणारी काही माणसे आणि मुले देखील या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असल्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यांनाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बेकायदेशीपणे चालवण्यात येणाऱ्या या फटाक्यांच्या फॅक्टरीच्या मालकाला अन्यत्र कारखाना चालवण्याचा परवाना देण्यात आला होता. स्फोटात जखमी झालेल्या ६ जणांपैकी तिघेजण ९८ टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेत्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यात कराचीमध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २ ठार आणि ३३ जखमी झाले होते.
The post Pakistan : पाकिस्तानात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ७ ठार तर, काही जण जखमी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











