मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या अत्याधुनिक कलादालनाचे लोकार्पण

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मीरा भाईंदर येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्याधुनिक कलादालनाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे कलादालन नागरिकांसाठी खुले होईल.

या कलादालनात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बाळासाहेबांचा बाळ ते बाळासाहेब हा जीवनप्रवास, एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द, मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि शिवसेनेची स्थापना अशा विविध पैलूंचे चित्रण येथे करण्यात आले आहे. यासोबतच, त्यांची प्रेरणादायी वचने, हिंदुत्वाचे विचार आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटवलेला ठसा या कलादालनाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. हे कलादालन शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याची एक अनोखी गाथा सादर करेल.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!