Bihar Election 2025 : आघाडीत बिघाडी.! बिहारच्या निकालाने ममता बॅनर्जींसह उद्धव ठाकरे नाराज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election 2025 – बिहार निवडणुकीचा परिणाम आता राज्यांच्या सीमा ओलांडत आहे. महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत संताप व्यक्त होतो आहे. पश्चिम बंगालची तृणमूल काॅंग्रेस आणि महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या पक्षांसह सर्वच राजकीय वर्तुळात या विजयाची चर्चा होत आहे. या संतापाच्या ज्वाला भीषण आगीत परवर्तीत होऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अन्यथा संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (१ ते १९ डिसेंबर) त्याचा परिणाम जाणवेल आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचे तुकडे होतील.

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी सांगितले की, काँग्रेसने ब्रह्मज्ञान शिकवण्यापेक्षा आधी आपल्या पराभवावर चिंतन करावे. काँग्रेस सातत्याने अपयशी ठरत आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा नंतर आता बिहारमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. जिथे भाजपला रोखण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, तिथेच पक्ष माती खात आहे. काँग्रेस राज्यांमध्ये ज्या पक्षांशी ती सहयोग करत आहे त्यांनाही बुडवत आहे. इंडिया गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कोणाची असावी याचा विचार काँग्रेसने स्वतः करावा.

तृणमूल काँग्रेसच्या मागील कामगिरीचे कौतुक करताना घोष म्हणाले, जर कोणताही पक्ष सातत्याने यश मिळवत असेल तर तो बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, २०२३ च्या पंचायत निवडणुकीत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजप खासदारांची संख्या कमी झाली, तर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढली. ममता बॅनर्जी देशात सर्वात लोकप्रिय आहेत, त्या सात वेळा खासदार, चार वेळा केंद्रीय मंत्री, दोन वेळा रेल्वे मंत्री आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. भाजपला पराभूत करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ममता बॅनर्जी आहे.

महाराष्ट्रात एक नवीन आघाडी उघडली
बिहार निवडणुकीच्या निकालांवरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये तणाव वाढला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात झालेल्या संकोच आणि जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्यात झालेल्या दीर्घ विलंबामुळे निवडणुकीत युतीचे मोठे नुकसान झाले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीला प्रचंड जनसमर्थन मिळाल्यावरच युतीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला हवे होते.

दानवे यांनी म्हटले आहे की, जर उद्धव ठाकरे यांना आधी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले असते आणि जागावाटप सुरळीतपणे झाले असते तर विधानसभा निवडणुकीचे निकाल खूप वेगळे आले असते. काँग्रेस नेते अतुल लोंढे यावर म्हणाले की, बिहारचा निकाल नीतीश कुमारांचा नाही तर ज्ञानेश कुमार (मुख्य निवडणूक आयुक्त) यांचा आहे. त्यांनी शिवसेना-उद्धव गटाच्या नेत्यांनी निवडणूक लढवलेल्या अनेक विधानसभा जागांवर आपले डिपॉझिट गमावले आहे. आघाडीमध्ये एकमेकांना लक्ष्य करण्याऐवजी सर्वांनी मत चोरी सारख्या मोठ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे.

महापालिका निवडणूक लढणार स्वतंत्र
काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुका मुंबईत एकट्याने लढवण्याचे संकेत दिले आहेत. ही घोषणा रमेश चेन्निथला यांनी दिल्लीमध्ये केली.रमेश चेन्निथला म्हणाले, आम्ही हा निर्णय राज्य समिती आणि स्थानिक पातळीवर सोपवला आहे. तथापि, मुंबई काँग्रेस समितीने ही निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून, मुंबई काँग्रेसचे अनेक प्रभावशाली नेते पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवून त्यांची संघटनात्मक ताकद पुन्हा निर्माण करण्याची परवानगी देण्यासाठी उच्च कमांडवर सार्वजनिक आणि खाजगीरित्या दबाव आणत आहेत. काॅंग्रेसने सर्व २२७ जागांसाठी तयारी सुरु केली आहे.

The post Bihar Election 2025 : आघाडीत बिघाडी.! बिहारच्या निकालाने ममता बॅनर्जींसह उद्धव ठाकरे नाराज appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!