नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे : मंत्री चंद्रकांत पाटील

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर या युएएफ एक्सपोचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले.

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजक, स्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे.

उर्मीजच्या कला मंचातर्फे डिझाईनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शन, करिअर समुपदेशन, विद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील.

मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहे, डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

The post नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे : मंत्री चंद्रकांत पाटील appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!