काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांचा समावेश

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसने शनिवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा समावेश आहे.

या यादीत विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, खासदार रजनी पाटील, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. २ डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. हे नेते महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका संस्थांमध्ये निवडणूक प्रचाराचे नेतृत्व आणि समन्वय करतील, असे पक्षाने म्हटले आहे.

The post काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांचा समावेश appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!