गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.
आता मात्र पीएम किसान योजनेचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.
या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.
















