Ram Sutar : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

Ram Sutar
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान केला. सध्या राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. त्यांनी साकारलेली शिल्पे आजही इतिहासाची साक्ष देत असतात.

राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत पुतळे उभारणीत हातखंडा आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव सूक्ष्म आणि बोलके संदेश पाहायला मिळतात. हा पुरस्कार प्रदान करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव असून राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला आहे. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्पं उभारली आहेत. त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.

शिल्पकार राम सुतार यांना यापूर्वी पद्मभूषण, पद्मश्री आणि टागोर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी, महात्मा गांधींचे अर्धपुतळे (भारतीय संसदेसह ४५० शहरांमध्ये) आणि याव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध शिल्पे तयार केली आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण २०२४ हा जाहीर करण्यात आला आहे. राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजही ते शिल्पं साकारतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली होती.

The post Ram Sutar : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!