शुभमनचं सारासोबत लग्न कधी होणार, उत्तर मिळालं! शुभमनचे वडील हसले अन्…

शुभमनचं सारासोबत लग्न कधी होणार, उत्तर मिळालं! शुभमनचे वडील हसले अन्…
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

shubman gill and sara tendulkar marriage : अभिनेत्रा, अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. याच उत्सुकतेपोटी अनेक सेलिब्रिटिंचे नाते हेदेखील खासगी राहात नाही. अनेकांची अफेअर्स, प्रेमकरणं समोर येतात. यात क्रिकेटर शुभमन गिल आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हेही वाचले नाहीत. हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. ते दोघेही अनेकदा सोबत स्पॉट झालेले आहेत. असे असतानाच आता शुभमन गिलच्या वडिलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी शुभमन आणि सारा तेंडुलकरच्या लग्नावर दिलेल्या रिअॅक्शनची सगळीकडेच चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सध्या समोर आलेला एक व्हिडीओ क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे. हा सामना पाहण्यासाठी शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंह हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या बाजूला एक लहान मुलगा भारतीय क्रिकेट संघाची जर्सी परिधान करून बसलेला आहे. तर दुसरीकडे शुभमनचे वडील पांढरे शुभ्र कपडे घालून सामना पाहात आहेत. त्यांचा व्हिडीओ क्रिकेट पाहायला आलेल्या एका क्रिकेट चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.

थेट विचारलं सारा, शुभमनचं लग्न कधी लावून देणार?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत समोरची व्यक्ती अंकलजी शुभमन गिलचे लग्न कधी लावून देणार, असे थेट विचारताना दिसत आहे. समोरच्या या व्यक्तीच्या प्रश्नानंतर शुभमनच्या वडिलांनी फक्त हात वर केला आहे. देवाच्या मनात जेव्हा येईल, तेव्हा लग्न होईल असे शुभमनच्या वडिलांनी इशाऱ्यानेच सांगितले आहे. त्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीने शुभमनचे लग्न सारा तेंडुलकरसोबत करणार का? असा दुसरा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाकडे मात्र शुभमनच्या वडिलांनी दुर्लक्ष केले आहे. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सारा आणि शुभमन यांच्या नात्याची वेळोवेळी चर्चा होते. अनेकदा वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये ते एकत्र दिसलेले आहेत. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्यावर कुठेही जाहीरपणे भाष्य केलेले नाही. असे असताना आता भविष्यात खरंच हे दोघे लग्न करणार का? हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!