Viral Video : डिग्र्यांना लावा काडी… अवघ्या तासात मोमोजच्या शेकडो प्लेट विकल्या; मोमोवाल्याच्या दिवसाच्या कमाईचा आकडा ऐकून उडालच…

Viral Video : डिग्र्यांना लावा काडी… अवघ्या तासात मोमोजच्या शेकडो प्लेट विकल्या; मोमोवाल्याच्या दिवसाच्या कमाईचा आकडा ऐकून उडालच…
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

आजकाल फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलं, अनेकांना वडापाव, बर्गर तर आवडतोच पण त्यासोबत मोमो खायचीहा आवड वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांत मोमोचा बिझनेसही झपाट्याने वाढला आहे. मोठ्या शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत, या फास्ट फूडला सर्वत्र मोठी मागणी असते. तयार करायला अतिशय सोपा आणि खायलाही फायदेशीर असल्यामुळे बरेच लोकं संध्याकाळी नाश्ता म्हणून किंवा रात्री उशीरा भूक लागल्यावरही मोमो खाणं पसंत करतात.
आज भारतातील जवळजवळ प्रत्येक शहरात आणि परिसरात मोमोजचा सुगंध सहज जाणवतो. हे स्ट्रीट फूड इतके लोकप्रिय झाले आहे की जिथे थोडी गर्दी असेल तिथे मोमोचा स्टॉल लागणं तर निश्चितच आहे. म्हणूनच लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की मोमोज विकून कोणी, प्रत्यक्षात किती पैसे कमवू शकते. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी एका सोशल मीडिया क्रिएटर या व्यवसायाचं बारकाईने निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला.

त्याचा एक व्हिडीोही त्याने पोसल्ट केला आहे. केवळ एका तासात इथे 118 प्लेट मोमो विकण्यात आले, त्यावरून या स्टॉलची लोकप्रियता समजू शकते, असं तो क्रिएटर व्हिडीओ मध्ये म्हमाला. तिथे एवढी गर्दी होती की, जास्तीचे मोमोज मागवावे लागले. संध्याकाळी रस्त्यावर वाहतूक वाढल्याने ग्राहकांची रांग वाढत गेली. लोकांचा ओघ थांबतच नव्हता, असं बरचं काही त्याने व्हिडीओमधून सांगितलं.

मोमो विक्रेत्याची कमाई किती ?

त्या इन्फ्लुए्सरच्या सांगण्यानुसार, रोज संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा मोमो स्टॉल लागतो. 5 तासांत इथे सतत ग्राहक येत असतात. 1 प्लेट मोमोची किंमत 110 रुपये आहे. क्रिएटरच्या सांगण्यानुसार, त्या दिवशी एकूण 950 प्लेट्स मोमो विकले गेले. त्यामुळे संपूर्ण प्लेट्सचा हिशोब केला , तर त्याची एका दिवसाची कमाई सुमारे 1 लाख 4 हजार 500 रुपयांच्या आसपास झाली.

एका दिवसांत जरा लाखभराची कमाई होत असेल तर महिन्याभरात तो विक्रेता 30 लाख रुपये आरामात कमावतो, असं विश्लेषण त्या क्रिएटरने केलं. एखाद्या छोट्याशा स्टॉसलाठी एवढी रक्कम खूप मोठी आहे, आणि त्यात गुंतवणूक फार नाही. इंस्टाग्राम क्रिएटर @cassiusclydepereira ने स्वतःचा हा व्हिडिओ पोस्ट केला, जो वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे.

 

त्यावर लोकांनी विविध मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. असे मोमोज कोण विकतं रे भावा, असा सवाल एकाने वितारल, तर दुसऱ्याने लिहीलं की एक प्लेट मोमोजसाठी 110 रुपये कोण देईल. तिसऱ्या यूजरने मात्र मजेशीर कमेंट केली,या मोमोवाल्याकडे तुम्ही इंटर्नशिप करू शकता. बघता बघता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!