Labour Union Dispute : मुंबईत भाजप-ठाकरेंची सेना भिडली, महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय धुमश्चक्री, घोषणाबाजीनं वातावरण तापलं, वाद नेमका काय?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबईतील सांताक्रुझ परिसरात भाजप आणि ठाकरे गटाची शिवसेना आमनेसामने आल्याने मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. कामगार युनियनच्या स्थापनेवरून हा वाद पेटला असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिस्थिती चिघळल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला.

सांताक्रुझ येथील ताज हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेची अनेक वर्षांपासून युनियन आहे. त्याच ठिकाणी भाजपने अखिल भारतीय कर्मचारी संघ युनियन स्थापन केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या युनियनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. मात्र, कामगार नसतानाही जबरदस्तीने युनियन स्थापन केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेने केला आहे. भाजप सत्तेत असल्याने पोलिसांच्या मदतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांमधील हा संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येते.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!