
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावजळ झालेल्या भीषण अपघाताने पुणेकरांना थक्क केले. गुरुवारी १३ नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेली भीषण अपघाताची घटना सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेली. या अपघातात एकूण आठ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या अपघातात एका मराठी अभिनेत्याचा देखील मृत्यू झाला आहे.
कारचालक असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील पाच जणांना बाहेर पडता आले नाही. अचानक आग लागल्याने सर्वजण आगीत जीवाच्या आकांताने ओरडत होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. धनंजय सहा महिन्यापासून वाहतूकीचा व्यवसाय करत होता. मूळचा तो कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा होता. पण पुण्यात राहत होता. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
धनंजयने काही नाटकांमध्ये काम केले आहे. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोपाईलवरती त्याने स्वतःचा उल्लेख अभिनेता म्हणून केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे धनंजय राहत होता. अपघात धनंजयचा बळी गेल्याने त्यांच्या तीन महिनांच्या मुलावरचे वडिलांचे छत्र हरपले आहे, तो वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला आहे, अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. धनंजयच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजयच्या पत्नीने त्याच्यासह डोहाळ जेवणाची पोस्ट केली . ही पोस्ट ठरली. हसऱ्या कुटुंबावर धनंजयच्या जाण्याने मोठा आघात झाला आहे.
सीसीटीव्हीची तपासणी
नवले पुलावर नेमका अपघात कसा झाला, यादृष्टीने तपास सुरू आहे. ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का?, यादृष्टीने तपास सुरू आहे. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने ट्रकने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली असून, पोलिसांनी नवले पूल परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : “मी कट्टर BJP समर्थक”; महेश कोठारेंनतर मराठीतील ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टचं बोलली!
The post अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु पोरकं झालं; बापाचं छत्र कायमचं गेलं : नवले ब्रीज अपघातात मराठी अभिनेत्याचा दुर्देवी अंत appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











