दिल्लीनंतर आणखी एक मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Nowgam Police Station Blast |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nowgam Police Station Blast |  श्रीनगरच्या नागौम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मोठा स्फोट झाला आहे. यात ९ जणांचा मृत्यू तर २९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मृतांमध्ये आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर पोलीस ठाण्याचा परिसरातील अनेक वाहनांना आग लागली. मध्यरात्री झालेल्या या भीषण स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.

पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचे नमुने घेत होते, त्यावेळी हा स्फोट झाला. विशेष म्हणजे, ही स्फोटके हरियाणातील फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉ. मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ३६० किलो स्फोटक रसायने आणि आयईडी बनवण्याचे साहित्य, ज्यात डेटोनेटर, तार आणि इतर घटक होते ते ठेवण्यात आले होते. Nowgam Police Station Blast |

‘PAFF’ या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे, मात्र अधिकारी या दाव्याची पडताळणी करत आहेत. सुरक्षा दलांनी स्निफर डॉग्सच्या मदतीने परिसर तपासला असून तो सील करण्यात आला आहे.  Nowgam Police Station Blast |

दिल्लीतील कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू 

या आठवड्यात दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरचे डीजीपी नलीन प्रभात यांनी शुक्रवारी संध्याकाळी संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा आढावा घेतला. यानंतर आता नौगाम स्फोटामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, यानुसार तपास केला जात आहे.   Nowgam Police Station Blast |

हेही वाचा : 

“साताऱ्याचा सितारा करतो”; अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात! थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

The post दिल्लीनंतर आणखी एक मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!