
आपण अनेकदा आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबण व फेसवॉश वापरत असतो. चेहरा चमकदार दिसावा यासाठी महागडे साबण वापरतो, पण महागड्या साबणात वापरले जाणारे केमिकल त्वचेची नैसर्गिक ओलावा हिरावून घेतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. म्हणून, जर तुम्हाला तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकवायचा असेल आणि त्याची चमक टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही घरगुती उपाय करून पहावेत.
आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक आहेत जे तुमची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर तुमची त्वचा डागरहित आणि मऊ देखील ठेवतात. तर आजच्या लेखात आपण साबणाऐवजी वापरता येतील असे काही घरगुती पर्याय जाणून घेऊयात.
बेसन
त्वचेच्या स्वच्छतेसाठी प्राचीन काळापासून बेसनाचा वापर केला जात आहे. त्यात क्लिंजिंग आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे बेसन चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा काढून टाकली जाते आणि चेहरा स्वच्छ आणि चमकदार राहतो. तुम्ही बेसनात दूध किंवा गुलाबपाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता.
कच्चे दूध
कच्चे दूध त्वचेसाठी एक उत्तम क्लिंजर आहे. त्यात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि ओलावा टिकवून ठेवते. मऊ कापसाच्या गोळ्यांनी कच्चे दूध चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
मुलतानी माती
मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि छिद्रे साफ करते. यामुळे त्वचेवरील मुरुमे देखील कमी होतात. गुलाबपाण्यात मुलतानी माती मिक्स करून लावा.
कोरफड जेल
कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुमांपासून बचाव करण्यास आणि त्वचेला आराम देण्यास मदत करतात. तर तुम्ही चेहऱ्यावर फ्रेश कोरफड जेल लावू शकता आणि काही वेळाने चेहरा धुवा. तर कोरफड जेल ही फेस वॉश म्हणून वापरले जाऊ शकते.
मध
शुद्ध मध त्वचेला हायड्रेट करते आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो. चेहऱ्यावर मध लावून हलक्या हाताने मालिश करा आणि साध्या पाण्याने धुवा.
हळद आणि दही
हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर हळद आणि दही मिक्स करून हे मिश्रण लावल्याने त्वचेचा रंग उजळवते आणि पोषण देते.
कडुलिंब पावडर
कडुलिंब पावडर जंतूंना मारते आणि मुरुमांशी लढते. यासाठी तुम्ही कडुलिंबाची पावडर गुलाबपाण्यात मिक्स करून ती फेसपॅक म्हणून चेहऱ्यावर लावा.
ओट्स
ओट्स त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करतात आणि खडबडीतपणा दूर करतात. तर ओट्स तुम्ही दुधात मिक्स करून स्क्रबर म्हणून वापरू शकता.
या घरगुती उपायांनी तुम्ही साबणाचे दुष्परिणाम टाळालच पण तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल आणि निरोगी राहील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











