
प्रभात वृत्तसेवा
पुणे – मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या अभय याेजनेला आज (शनिवार) पासून सुरुवात होणार आहे. या योजनेत निवासी, तसेच व्यावसायिक मिळकतींना मिळकतकराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेवर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र, २०१६ नंतर महापालिकेने राबविलेल्या अभय योजनांचा लाभ घेतलेल्या १ लाख ४० हजार थकबाकीदारांना या योजनेतून वगळले असल्याने या योजनेचा लाभ सुमारे चार लाख ९७ हजार १७२ थकबाकीदारांना मिळणार आहे.
ही योजना १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, थकबाकीदारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा कर संकलन केंद्रात जाऊन ही थकबाकी भरता येणार आहे. या योजनेबाबत महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून, पालिकेस चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे सुमारे १४ लाख मिळकतींची नोंदणी आहे.
त्यातील सुमारे ६ लाख ३८ हजार मिळकतधारक थकबाकीदार असून, ही थकबाकी एकूण १२ हजार १६१ काेटी रुपयांची आहे. महापालिका थकबाकीवर दाेन टक्के म्हणजेच वर्षाला २४ टक्के दंड आकारत असल्याने मूळ थकबाकी तीन हजार १५८ काेटी रुपये असून, त्यावरील दंड तब्बल नऊ हजार दोन काेटी रुपये आहे. त्यामुळे या थकबाकीची वसुली कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
असा घेता येईल लाभ
या योजनेचा लाभ करदात्यांना नियमित कर भरण्याच्या प्रक्रियेनुसारच घेता येणार आहे. त्यासाठी थकबाकीदार ऑनलाइन आपले बिल पाहून त्यानुसार थकबाकी आणि माफ केलेल्या व्याजाची रक्कम भरू शकतात. ज्या मिळकतधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यांना पालिकेच्या संकेतस्थळावर आपले बिल पाहता येणार आहे. त्यात मूळ थकबाकी, व्याजाची रक्कम आणि मिळणारी सवलत याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय महापालिकेच्या कर भरणा केंद्रात जाऊनही त्याची माहिती घेता येईल. कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांना एसएमएस पाठविण्यात आले असून, त्यात ज्यांना सवलत मिळणार आहे, त्यांना वेगळा मेसेज आणि सवलत मिळणार नाही त्यांनाही मेसेजद्वारे कळविले असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
The post PMC News : आजपासून अभय योजनेला आजपासून सुरुवात; थकबाकीदारांना ७५% व्याजमाफी, असा घ्या लाभ appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











