Navale Bridge Accident : तो बालहट्ट जीवावर बेतला…देवदर्शनाला जाण्याचा हट्ट ३ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जणांसाठी ठरला अखेरचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे –
नवले पूल येथील भीषण अपघातात कारमधील चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश होता. अपघातातील मृत हे धायरी येथे राहणारे होते. अपघात स्थळापासून घर हाकेच्या अंतरावर होते. यामुळे मृत्यू कोणाला कसा गाठेल हे सांगता येणार नाही असे बोलले जाते ते खरे वाटत आहे. तर चिमुकलीच्या दुदैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत स्वाती नवलकर या आई-वडील आणि शेजारील चिमुकलीला घेऊन नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यासाठी त्यांनी कॅब भाड्याने घेतली होती. त्यांच्यासोबत पती, मुलगी आणि मुलगा आला नाही. त्यांना अपघाताची खबर खूप उशिरा कळाली. पती संतोष यांना घटना कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तर चिमुकला मुलगा अद्यापही काय घडलं हे न समजण्याच्या परिस्थितीत आहेत. तिकडे मोक्षिताच्या घरच्यांनाही धक्का बसला आहे.

स्वाती संतोष नवलकर (३५, विश्‍वास पॅलेस धायरी फाटा, पुणे), स्वातीची आई शांता दत्तात्रय दाभाडे (५४), वडील दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (५८, दोघे रा. सत्यसाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 10, धायरी फाटा पुणे), मोक्षिता हेमकुमार रेड्डी (०३ , पॅराडाईज वनलक्ष्मी चौक, चिखली) आणि कार चालक धनंजय कुमार कोळी (३०, रा. सोनवणे वस्ती चिखली पुणे, मूळगाव जयसिंगपूर कोल्हापूर)

मोक्षिताचा बालहट्ट बेतला जीवावर –
स्वाती नवलकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी रेड्डी परिवार आला होता. तसेच, स्वाती यांचे आई-वडीलही आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या नारायणपूर येथे देवदर्शनाला आई-वडिलांना घेऊन निघाल्या. मात्र, त्यावेळी मोक्षिताने त्यांच्याबरोबर जाण्याचा बालहट्ट घातक ठरला.

तीची समजूत घातली गेली, मात्र, ती काही ऐकायला तयार नव्हती. यामुळे रेड्डी दाम्पत्याने तिला स्वाती यांच्याबरोबर जाऊ दिले. यानंतर ते दोघे आपल्या घरी चिखली येथे परतले. दुसऱ्या दिवशी येऊन मोक्षिताला घेऊन जायचे असे ठरले होते.

कारचालक धनंजय कोळी हा मूळचा कोल्हापूरच्या जयसिंगपूरचा आहे. तो चिखली येथे राहून कॅब चालवत होता. तो वेळ अभिनेता असून वेळ मिळेल तसा नाटकांमध्ये काम करीत होता.
(कारमधील मयत प्रवासी)

The post Navale Bridge Accident : तो बालहट्ट जीवावर बेतला…देवदर्शनाला जाण्याचा हट्ट ३ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जणांसाठी ठरला अखेरचा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!