धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून; आरोपी फरार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर –
शिरोली (शिंदेवस्ती, ता. खेड) येथे अनैतिक संबंधातून प्रियकराकडून 46 वर्षीय विवाहित प्रेयसी महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ही घटना गुरुवारी (दि. 13) रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास घडली. खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय 46, रा. कल्याण, जि. ठाणे) असे आहे. ती मूळची ठाणे जिल्ह्यातील असली तरी गेल्या काही दिवसांपासून खेड येथील प्रियकराच्या घरी वास्तव्यास होती असे स्थानिक नागरिक व पोलिसांनी सांगितले. खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललित दिपक खोल्लम (वय 37, रा. शिंदेवस्ती शिरोली, ता. खेड) हे शिरोली येथील एका इमारतीत दुसर्‍या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत होते.

ललित खोल्लम याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. त्याच रागातून ललितने रूपालीचा गळा चिरून खून केल्याचा पोलिसांनी प्राथमिक संशय आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडणाचे काही आवाज आल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. मात्र चौकशी अंती सव्वा अकरा वाजता रक्तबंबाळ अवस्थेत रूपालीचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली.

खेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, ललित खोल्लम याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत, संशयित ललित या घटनेनंतर फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

The post धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून; आरोपी फरार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!