
प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची पसंती मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीकडे झुकत असून, आघाडी एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. नगरपरिषदेमधील 24 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी आघाडीने सुरू केलेल्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महाविकास आघाडीचे शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पक्ष कार्यालयात या मुलाखती पार पडल्या.
नगराध्यक्ष व बारा प्रभागांसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत आघाडीने स्थानिक कार्यकर्त्यांच्या जनाधारास प्राधान्य देण्याच्या भूमिकेची पुनरुज्जीवित केले. मुलाखत प्रक्रियेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, विश्वासकाका ढमढेरे, पांडुरंग अण्णा थोरात, शिवसेना तालुका प्रमुख पोपट शेलार, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, संजय देशमुख, मंगेश खांडरे, मुन्ना शेख, माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव यादव, अॅड. किरण आंबेकर, अॅड. प्रदीप बारवकर, अजिम सय्यद, राष्ट्रवादीचे मुजफ्फर कुरेशी, राहील शेख, हाफिज बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या.खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिरूरवासीयांचा कल आघाडीकडे असल्याचे प्रत्यय मुलाखत प्रक्रियेत मिळत आहे. पारदर्शक निकषांवर आधारित उपयुक्त उमेदवारांची निवड होणार असून शिरूरच्या विकासाला ही निवडणूक नवी दिशा देईल.
माजी आमदार अशोक पवार यांनीही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आघाडी मजबूत असल्याचे सांगितले. शहराच्या मूलभूत सुविधांचा विकास आणि नागरिकाभिमुख निर्णय हेच आमचे प्राधान्य, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या छाननी समितीने उमेदवारांच्या मुलाखतींचा पहिला टप्पा पूर्ण केला असून पहिली उमेदवारांची अधिकृत यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
The post शिरूरची सत्ता जिंकण्यासाठी मविआ एकवटली! २४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती, अमोल कोल्हे म्हणाले.. appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











