
प्रभात वृत्तसेवा
सासवड – आगामी सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणाचे नाव जाहीर करायचे, तसेच नगरसेवक पदांसाठी कोणत्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची, यावरून पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळे पक्षात बंडखोरीची चिन्हे स्पष्टपणे दिसत असून हे संकट थोपवण्यासाठी वरिष्ठांकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत.
भाजपची अधिकृत उमेदवार यादी अद्याप जाहीर न झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. पक्षांतर्गत चर्चा आणि गटबाजीमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. काही प्रभागांत दोन ते तीन जण उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याने पक्ष नेतृत्वावर उमेदवार निश्चित करण्याचा दबाव वाढला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी अभिजीत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. जगताप हे अनुभवी कार्यकर्ते असून आघाडीने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून सचिन भोंगळे हे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. यामुळे सासवडमध्ये महत्त्वाच्या तिघांमध्ये चुरस पाहायला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपमध्ये असंतोष
दरम्यान, भाजपामधील असंतोषाला आणखी ऊत आला, कारण माजी आमदार संजय जगताप यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे चंद्रकांत गिरमे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. यानंतर त्यांनी आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून आणखी काहीजण बंडखोरीच्या मार्गावर जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
The post Saswad Election : सासवडमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण; उमेदवार ठरवण्यापूर्वीच पक्षात ‘महाभारत’ appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











