Alandi Election : आळंदी नगरपरिषदेसाठी रणधुमाळी सुरू, आतापर्यंत आठ उमेदवारांचे अर्ज दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
आळंदी –
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शुक्रवारी (दि. 14) एकूण 8 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.नगराध्यक्ष पदासाठी सुरेश वामनराव दौंडकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर, सदस्य पदासाठी सागर तुळशीराम भोसले यांनी प्रभाग क्रमांक दोन ’ब’ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज सादर केला आहे. कांचन उमेश कुर्‍हाडे यांनी प्रभाग क्रमांक पाच ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत, तर अमोल गंगाराम केकान यांनी प्रभाग क्रमांक 9 अ मधून आपला अर्ज भरला आहे.

याशिवाय, माधवी राहुल चोरडिया यांनी प्रभाग क्रमांक 10 ब साठी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असे दोन अर्ज तसेच प्रभाग क्रमांक 10 क’ साठी एक अर्ज असे एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे, आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या आठ झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिली आहे.

The post Alandi Election : आळंदी नगरपरिषदेसाठी रणधुमाळी सुरू, आतापर्यंत आठ उमेदवारांचे अर्ज दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!