
प्रभात वृत्तसेवा
नसरापूर – भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील चेलाडी फाटा ते बनेश्वर मंदिर या रस्त्यावर भूमिगत केबल टाकणे आणि लाईट शिफ्टिंग या अत्यंत महत्त्वाच्या विकासकामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या या कामासाठी एकूण अंदाजपत्रक रक्कम रुपये १,१८,६०,६९३ इतकी असून, या कामाची जबाबदारी अग्रवाल इलेक्ट्रिकल्स अँड वर्क्स, निरा (ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या कामासाठी सरपंच उषा कदम आणि माजी उपसरपंच संदीप कदम यांनी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू झाला आहे. या कामामुळे गावाच्या प्रकाशयोजना, सुरक्षितता आणि सौंदर्यवर्धनात मोठी सुधारणा होणार आहे.या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन नसरापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते पार पडले. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष विशाल (बंटी) कोंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपसरपंच इरफान हबीब मुलाणी, उपसरपंच नामदेव चव्हाण, गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, माजी सरपंच रोहिणी शेटे, माजी सरपंच सपना झोरे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा हाडके, ग्रामपंचायत सदस्य अॅड. मेघा लष्कर, ग्राम विकास अधिकारी रुपेश हारपुडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, विशाल (बंटी) कोंडे, गणेश निगडे, ज्ञानेश्वर पांगारे, हनुमंत तात्या कदम, तसेच एमएसईबीचे बराबदे, सरपंच उषा विक्रम कदम, नामदेव चव्हाण, संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, रुपेश हारपुडे, भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
बनेश्वर मंदिर रस्ता आता प्रकाशमय होणार
या प्रकल्पामुळे चेलाडी फाटा ते बनेश्वर मंदिर रस्ता परिसरातील जुन्या वीजवाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील विजेच्या तारा जमिनीखाली गेल्याने अपघाताचा धोका कमी होईल, तसेच प्रकाशयोजना अधिक सुरक्षित आणि आकर्षक बनेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आधुनिक दिव्यांची व्यवस्था होणार असून, त्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढणार आहे.
The post Bhor News : नसरापूरच्या विकासाला गती; चेलाडी फाटा ते बनेश्वर रस्त्यावरील प्रलंबित कामाचे भूमिपूजन संपन्न appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











