
Bihar Election Result 2025 : लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचाही पराभव झाला आहे. या पराभवामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही मोठा धक्का बसलाआहे. तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल या पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र या मतदारसंघात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
या मतदारसंघात लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार संजय कुमार सिंह यांचा विजय झाला आहे. संजय कुमार सिंह यांनी ८७,६४१ मते मिळवली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे मुकेश कुमार रौशन यांना ४२,६४४ मते मिळाली आहेत. तर तेजप्रताप यादव यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना ३५,७०३ मते मिळाली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर आरजेडीने या जागेवर उमेदवार दिला नसता तर कदाचित तर लोजपचे उमेदवार संजय कुमार सिंह आणि तेजप्रताप यादव यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली असती. मात्र तेजस्वी यादव यांनी मुकेश कुमार यांना तिकीट दिल्यामुळे मतविभाजनाचा फटका बसून तेजप्रताप यांचा पराभव झाला.
The post Bihar Election Result 2025 : लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचा दारूण पराभव appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











