Ashok Chavan : नांदेडमध्ये अशोक चव्हाण एकाकी! चिखलीकरांकडून हेमंत पाटील यांचे समर्थन

Ashok Chavan
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नांदेड : नगर परिषद व नगर पंचायतींचा बिगूला वाजला आहे. येत्या २ डिसेंबरला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून इच्छूकांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीने कोणताही युतीचा प्रस्ताव दिला नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी निवडणूकीच्या धुमाकुळीत अशोक चव्हानांवर आरोप केले असून, त्यांनी नांदेड महापालिकेच्या जागा बीओटी तत्त्वावर विकल्या असल्याचा आरोप केला आहे. हेमंत पाटील, हे शिवसेनेचे आमदार असल्याने, महायुतीमध्येच सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसून आले. अशोक चव्हाण हे नांदेडमधील भाजपचा चेहरा असून, त्यांच्यावरच हेमंत पाटलांनी आरोप केल्याने, महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यातच पूर्वी भाजपमध्ये असलेले, परंतू लोकसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामिल झालेल्या प्रताप पाटील चिखलीकरांनी देखील आमदार हेमंत पाटील यांची बाजू घेताना, त्यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन केले आहे. त्यांनी या विषयावर भाष्य करताना, चोराला चोर म्हटले, त्यामध्ये वाईट काय ? अशी प्रतिक्रीया देताना अशोक चव्हाणांना टोला लगावला आहे.

सध्याच्या घडीला अशोक चव्हाणांवर महायुतीतील दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी टीका केल्याने, अशोक चव्हाण आपल्याच जिल्ह्यात एकाकी पडले आहेत. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागल्याने, अशोक चव्हाण दोन्ही महायुतीतील नेत्यांच्या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात, यावर अनेक राजकिय गणिते अवलंबून असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

The post Ashok Chavan : नांदेडमध्ये अशोक चव्हाण एकाकी! चिखलीकरांकडून हेमंत पाटील यांचे समर्थन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!