
पाटणा : निवडणूक रणनीतीकार म्हणून मोठा लौकिक प्राप्त करणारे प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात सक्रिय झाले. त्याआधी रणनीतीकार म्हणून ते इतर विविध पक्षांच्या विजयाचे हिरो ठरले. मात्र, स्वत:च्या राजकीय पदार्पणात ते झिरो ठरले. मोठा गाजावाजा झालेला प्रशांत किशोर फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचे समोर आले.
बिहार निवडणुकीला यावेळी तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता प्रारंभी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी कारणीभूत ठरली ती ४८ वर्षीय किशोर यांची राजकारणातील एन्ट्री. त्यांनी स्थापन केलेल्या जन सुराज पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. किशोर आणि त्यांच्या पक्षाची प्रचार मोहीम लक्षवेधी ठरली. त्यांनी विविध मुद्द्यांवर मांडलेली भूमिका प्रभावी ठरत असल्याचेही मानले जाऊ लागले.
मूळचे निवडणूक रणनीतीकार असल्याने त्यांनी केलेली २ भाकिते तर मोठ्या चर्चेचा विषय ठरली. आमचा पक्ष एकतर मोठी मुसंडी मारेल किंवा भुईसपाट होईल, असे भाष्य त्यांनी केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष (जेडीयू) २५ जागांचा पल्ला ओलांडू शकणार नाही, असे त्यांचे दुसरे भाकीत होते. त्यातील जेडीयू विषयीचा किशोर यांचा अंदाज साफ चुकला. पहिल्याच प्रयत्नात किशोर यांचा पक्ष खातेही उघडू शकला नाही. त्यामुळे स्वपक्षाविषयीचे त्यांचे भाकीत एकप्रकारे खरे ठरले.
The post Prashant Kishor : इतरांच्या विजयातील हिरो स्वत: ठरले झिरो! प्रशांत किशोर फॅक्टर ठरला निष्प्रभ appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











