
Vaibhav Suryavanshi Record Century in IND A vs UAE Match : भारताचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. वैभवने फक्त ३२ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. त्याची ही विक्रमी खेळी आशिया कप राइजिंग स्टार्स स्पर्धेत यूएईविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. शतक पूर्ण केल्यानंतरही वैभव थांबला नाही आणि तो धावांचा डोंगर उभारतच राहिला.
१० चौकार आणि ९ षटकारांनी शतक पूर्ण –
भारत ‘अ’ संघाकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने यूएई विरुद्धच्या सामन्यात फक्त ३२ चेंडूत शतक पूर्ण केले. या धडाकेबाज खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकार लगावले. त्याने अवघ्या १७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर तो शतकाकडे वेगाने वळला. सामन्यात भारताची पहिली विकेट लवकर पडली होती, जेव्हा दुसरा सलामीवीर प्रियांश आर्य ६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. पण यानंतरही वैभव थांबला नाही. दुसऱ्या टोकाकडून त्याला नमन धीरची चांगली साथ मिळाली.
स्ट्राइक रेट ३०० पार, केवळ ७ निर्धाव चेंडू
Vaibhav Suryavanshi walks back after a brilliant 144 off 42.
He leaves the field to a standing ovation — not just from the crowd, but from everyone in the team dugout as well.
#VaibhavSuryavanshi #EmergingAsiaCup #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/OXS48mlWKl
— Sportskeeda (@Sportskeeda) November 14, 2025
जेव्हा प्रियांश आर्य १६ धावांवर बाद झाला, तेव्हाही वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट ३०० हून अधिक होता. वैभव जेव्हा शतक पूर्ण करण्याच्या मार्गावर होता, तेव्हा त्याने फक्त ७ निर्धाव चेंडू खेळले होते. याचाच अर्थ प्रत्येक चेंडूवर तो चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता आणि यात तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. भारताने १० षटकांतच १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. दुसऱ्या बाजूला नमन धीरने त्याला चांगली साथ दिली.
हेही वाचा – PAK vs SL : बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये दहशत! श्रीलंकेच्या संघाला पंतप्रधानांसारखी सुरक्षा, VIDEO व्हायरल
पाकिस्तानविरुद्ध पुढचा सामना –
यूएई विरुद्धच्या या सामन्यादरम्यान भारताने धावांचा डोंगर उभा केला. वैभवने बाद होण्यापूर्वी केवळ ४२ चेंडूत तब्बल १४४ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट ३४२.८६ इतका अविश्वसनीय होता. विशेष म्हणजे, त्याच्या डावात चौकारांपेक्षा षटकारांची संख्या अधिक होती. या सामन्यानंतर भारत ‘अ’ संघाचा पुढचा सामना १४ नोव्हेंबरला पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध होणार आहे. वैभवने याच फॉर्ममध्ये पाकिस्तानविरुद्धही फलंदाजी केल्यास, तो सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरेल.
The post IND A vs UAE : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने वेधलं लक्ष! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी शतक appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.














