
Sri lanka team security video viral : श्रीलंका क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये झालेल्या एका भीषण बॉम्बस्फोटामुळे या दौऱ्यावर भीतीचे सावट पसरले आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीच्या वातावरणातही श्रीलंकेच्या खेळाडूंना संपूर्ण मालिका खेळण्यास भाग पाडण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने संघाला अभूतपूर्व आणि कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रीलंकन खेळाडूंना कारवाई करण्याची धमकी –
रावळपिंडीमध्ये मालिका सुरू असताना, राजधानी इस्लामाबादमधील न्यायालयाबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या संघातील अनेक खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना थांबवण्यासाठी खूप मनधरणी केली. मात्र, खेळाडू माघारीच्या निर्णयावर ठाम होते. अशा परिस्थितीत, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दौरा अर्ध्यातून सोडून परतणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर खेळाडूंना नाईलाजाने संपूर्ण मालिका खेळावी लागत आहे.
अभूतपूर्व ‘VVIP’ सुरक्षा व्यवस्था –
Sri Lankan cricketers getting the full VVIP protocol in Pakistan
From the stadium to the hotel — next level hospitality!pic.twitter.com/QJCe2ACXqT
— Senu_Kavi (@KaviSenu) November 13, 2025
खेळाडू थांबल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने संघासाठी तातडीने ‘पंतप्रधानांसारखी’ (VVIP) सुरक्षा व्यवस्था जाहीर केली. सुरक्षा व्यवस्थेतील हा बदल रस्त्यावर दिसून आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये श्रीलंकेचा संघ सराव करून हॉटेलकडे परतत असताना, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा ताफा दिसत आहे.
- हा ताफा डझनभर पोलीस वाहनांनी युक्त होता.
- संघ स्टेडियममधून बाहेर पडताच, पुढे दोन पिकअप ट्रक होते. त्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला घेऊन जाणाऱ्या सहा बसेस होत्या.
- प्रत्येक बसच्या मागे एक पोलिसांचा पिकअप ट्रक होता.
- विशेष म्हणजे, स्टेडियमपासून हॉटेलपर्यंतचा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तान बोर्डाला मालिकेचे वेळापत्रकही बदलावे लागले. १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी होणारे उर्वरित दोन सामने आता अनुक्रमे १४ आणि १६ नोव्हेंबर रोजी एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत.
The post PAK vs SL : बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये दहशत! श्रीलंकेच्या संघाला पंतप्रधानांसारखी सुरक्षा, VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.















