रश्मिकाच्या ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी फिरवली पाठ! सात दिवसात केवळ ‘इतकेच’ बॅाक्स अॅाफिस कलेक्शन

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

The Girlfriend Boxes Office Collection : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. आयुष्मान खुरानाचा थामा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू असून द गर्लफ्रेंड चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हे खरंतर पहिल्यांदाच होत आहे, कारण रश्मिकाच्या आतापर्यंत सर्वंच चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई केली आहे. पण द गर्लफ्रेंड हा चित्रपट त्याला अपवाद ठरला आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी रश्मिका मंदाना ही एक आहे. या अभिनेत्रीने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत मोठे नाव कमावले आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केला असता, बॉलिवूड असो किंवा टॅालिवूड़ रश्मिका मंदाना अनेक मोठ्या कलाकारांसाठी भाग्यवान ठरली आहे आणि तिच्या अनेक चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई केली आहे. यामध्ये छावा, अ‍ॅनिमल आणि पुष्पा २ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

पण, रश्मिकाचा द गर्लफ्रेंड चित्रपटाची म्हणावी अशी चर्चा झाली नाही. चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्या दिवशी हवा तसा प्रतिसाद चित्रपटाला मिळालेला नाही. पण हळूहळू चित्रपटाची कमाई काही प्रमाणात वाढत गेल्याचे दिसत आहे.

रिलीजच्या सातव्या दिवशी, चित्रपटाने १.१० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे कलेक्शन आणखी चांगले होईल आणि आठवड्याच्या शेवटी त्यात वाढ होईल, असा अंदाज आहे. अहवालांनुसार, चित्रपटाने सात दिवसांत भारतात ११.२५ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या परदेशातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, परदेशात खूप चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांतच, चित्रपटाने जगभरात १८ कोटींची कमाई केली आहे. सातव्या दिवसाची कमाई विचारात घेतली तर चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण बॅाक्स अॅाफिस कलेक्शन १९.१० कोटींवर पोहोचले आहे. यामध्ये सातव्या दिवसाचे परदेशातील बॅाक्स अॅाफिस कलेक्शनचा आकडा जोडण्यात आलेला नाही.

एकंदरीत, चित्रपट अजूनही त्याच्या ४२ कोटी रुपयांच्या बजेटपासून खूप दूर आहे. जर त्याला त्याचे बजेट वसूल करायचे असेल, तर चांगले बॅाक्स अॅाफिस कलेक्शन करावे लागणार आहे.

हेही वाचा : Bihar Election 2025 : ‘बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल…’; ठाकरे संतापले !

The post रश्मिकाच्या ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी फिरवली पाठ! सात दिवसात केवळ ‘इतकेच’ बॅाक्स अॅाफिस कलेक्शन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!