
Bihar Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार आहे. मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. यावरून सध्या बिहारमध्ये भाजपकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. समोर येत असलेल्या या निकालांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवले.” Bihar Election 2025 |
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
महागठबंधनला सुरुवातीच्या कलांनुसार अद्याप ५० जागाही मिळालेल्या नाहीत. काँग्रेसने अद्याप दोन आकडी संख्याही गाठलेली नाही. तर एनडीएने १९१ जागांवर आघाडी घेतली आहे. महाआघाडीच्या या अपयशावर आश्चर्य वाटत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. Bihar Election 2025 |
हेही वाचा :
भाजपसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जागेवर फुलले कमळ ; निवडणूक आयोगाने जाहीर केला निकाल
The post “एकदम महाराष्ट्र पॅटर्न! निकालाने धक्का बसण्याची गरज नाही”; बिहार निवडणूकीच्या निकालांबाबत संजय राऊतांची टीका appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











