
Supriya Sule : आज सकाळपासूनच देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती यायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे कलांमध्ये दिसत आहे. बिहार विधानसभेसाठी एक्सिट पोलमध्ये देखील एनडीएच्या सर्वाधिक जागा विजयी होतील अंदाज वर्तवण्यात आला होता.
आता तशाच पद्धतीचे चित्र बिहार विधानसभेत पाहायला मिळत आहे. आज बिहार विधानसभेच्या निकालाचा दिवस असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट सुप्रिया सुळे घेतली असून चर्चांना उधाण आले होते.
या भेटी मागचे कारण समोर आले आहे. सुप्रिया सुळे या त्यांचा भाचा युवा नेते युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लग्नाची पत्रिका देत आमंत्रित केले आहे. या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का? याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. पण बिहार निवडणुकीच्या निकाल दिवशी अचानक सुप्रिया सुळे फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षांवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. आता भेटीमागेचे कारण समोर आल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
नवले पूल अपघात: सुप्रिया सुळेंची गडकरींना ‘ही’ विनंती
नवले पूल येथे काल झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत काही नागरीक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापुर्वीही येथे झालेल्या अपघातात जिवितहानी झाली आहे. हे रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेबाबत देखील सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरज आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हेही वाचा : आघाडी-पिछाडीचा खेळ! बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ; जेडीयूची पिछाडी
The post बिहार विधानसभा निकालाच्या धामधूमीत सुप्रिया सुळेंनी घेतली CM फडणवीसांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











