
TRTI Training Program
सन २०२५-२६ करीता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून PSI/STI/ASO, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात आले होते.
उपरोक्त नमूद पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनांच्या लाभार्थी निवडीकरीता दि.२०/११/२०२५ ते दि. २४/११/२०२५ या कालावधीत ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षा (CET) आयोजित करण्यात येणार आहे, तरी याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सामायिक चाळणी परीक्षा (CET) संदर्भात महत्वाची सूचना
TRTI Training Program
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या ४०० उमेदवारांना एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या पीएसआय, एसटीआय, एएसओ आदी पदांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत नामांकित खासगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार असून, अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व अर्जासाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला (http://trti.maharashtra.gov.in) भेट देणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता आणि सीईटीमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. या प्रक्रियेवरील अंतिम अधिकार आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडे असतील.
The post TRTI संस्थेकडून अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी पूर्व प्रशिक्षण CET परीक्षा वेळापत्रक जाहीर | TRTI Training Program appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











