आगे-पिछाडीचा खेळ! बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ; जेडीयूची पिछाडी

Bihar Election Results 2025। 
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election Results 2025। बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव?कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे. दरम्यान , आज सकाळपासून सुरु असणाऱ्या मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएतील मित्र पक्षच आघाडी आणि पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काही कलांमध्ये आघाडीवर असणारी नितीशकुमार यांची जेडीयू आता पिछाडीवर पडल्याचे समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सर्व २४३ जागांसाठी कल जाहीर केले आहेत. आता समोर आल्रेल्या कलानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. निवडणूक आयोगाच्या मते, भाजपने ८७ जागांवर आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू ७९ जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी ३४ जागांवर आघाडीवर आहे, तर रामविलास पासवान लोजपा २२ जागांवर आघाडीवर आहे.  Bihar Election Results 2025। 

दरम्यान , आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मतमोजणीच्या ६ फेऱ्यांनंतर तेजप्रताप यादव यांना फक्त ४,००० मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे तेजसवी यादव याना देखील पिछाडी मिळाली आहे.

दरम्यान, महुआ मतदारसंघात तेजप्रताप यादव १४,००० पेक्षा जास्त मतांनी मागे आहेत. मतमोजणीच्या २६ फेऱ्यांपैकी सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेजप्रताप यादव यांच्यासाठी तणाव निर्माण झाला आहे. त्यांना आतापर्यंत फक्त ४,३९९ मते मिळाली आहेत. दरम्यान, लोजपाचे उमेदवार संजय सिंह १९,१०६ मतांसह आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांचे उमेदवार मुकेश कुमार रोशन दुसऱ्या स्थानावर आहेत. Bihar Election Results 2025। 

The post आगे-पिछाडीचा खेळ! बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ; जेडीयूची पिछाडी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!