बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या कलांनुसार, एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत एकतर्फी विजय संपादन केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जेडीयू ८३ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपने ८० जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. एलजेपी २२ जागांवर आघाडीवर असून, एनडीए एकूण १८९ जागांवर आघाडीवर आहे.
याउलट, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. आरजेडी केवळ ३३ आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे, तर डाव्या पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत. महाआघाडी एकूण ४७ जागांवर आघाडीवर आहे. हा निकाल नितीश कुमार यांच्यासाठी भावनिक विजय ठरला असून, बिहारमध्ये पुन्हा एकदा “नीतीश कुमार” अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. विरोधकांच्या अँटी-इन्कम्बन्सी आणि मतचोरीच्या आरोपांचा निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











