प्रशांत किशोरांची पिछेहाट; पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या ‘जनसुराज’ पक्षाची निराशजनक कामगिरी

Bihar Elections 2025 |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Elections 2025 |  बिहार विधानसभा निवडणुकीचा आज अंतिम निकाल जाहीर होणार आहे. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली आहे. समोर येत असलेल्या निकलानुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर महाआघाडीचा दारुण पराभव होताना दिसत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्ष रिंगणात उतरला होता. मात्र या पक्षाला मतदारांनी फारशी पसंती दिली नसल्याचे दिसत आहे.

जनसुराज पक्षाने ग्रामीण भागाचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्य यांसारख्या विषयांवर मोहिम उभारली होती. त्यामुळे जनतेत नवीन पर्यायाची चर्चा निर्माण करण्यात हा पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाला होता. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.  Bihar Elections 2025 |

एकाही जागेवर आघाडी नाही 

एकाही जागेवर प्रशांत किशोर यांचा पक्ष आघाडी घेताना दिसत नाही. प्रशांत किशोर यांनी राज्यातील सर्व २४३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण सध्या एकाही जागेवर त्यांना आघाडी दिसत नाही. सुरुवातीच्या कलांमध्ये, 3 ते 4 जागांवर त्यांच्या पक्षाने आघाडी घेतली होती. पण मतमोजणी पुढे सरकत असताना त्यांचा पक्ष मागे पडताना दिसत आहे.

प्रशांत किशोर राजकारण सोडणार ? 

प्रशांत किशोर यांनी बिहार निवडणुकीबाबत अनेक दावे केले होते. त्यांनी नीतीश कुमार यांच्या पक्षाला जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या तर ते राजकारणातून संन्यास घेतील. मात्र आतापर्यंतच्या  कलांमध्ये जेडीयू ७५ जागांवर आघाडी घेताना दिसत आहे. Bihar Elections 2025 |

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, जेडीयू सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, तर भारतीय जनता पक्ष त्या खालोखाल दुसऱ्या नंबरला आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए किंगमेकर ठरत असल्याचे दिसत  आहे.  Bihar Elections 2025 |

हेही वाचा: 

लालू प्रसाद यादवांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर; तेजस्वी यादव ३०००हून जास्त मतांनी पिछाडीवर

The post प्रशांत किशोरांची पिछेहाट; पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या ‘जनसुराज’ पक्षाची निराशजनक कामगिरी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!