ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! भाजपची रणनिती फळाला; ‘या’ जिल्ह्यात मोठी राजकीय उलधापालथ

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Politics of Nashik : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कमालीचे इन्कमिंग वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यानंतर आज १४ नोव्हेंबरला मोठी राजकीय उलधापालथ होणार आहे. सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा डाव टाकत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका आणि सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांना गळाला लावले आहे.

आज शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी ते भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची ताकद सिन्नरमध्ये वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ते आगामी निवडणुकीत सिन्नर नगरपरिषदेसाठी नगराध्यपदाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी माहिती मिळत आहे. याआधीच राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे भाजपात दाखल झाले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

उद्धवसेनेला मोठा धक्का

हेमंत वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत काका आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने उद्धवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

कोण आहेत हेमंत वाजे?  

हेमंत वाजे हे राज्यातील पहिल्या महिला आमदार रुक्मिणीबाई विठ्ठल वाजे यांचे चिरंजीव आहेत. हेमंत वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या वडिलांनी, स्वर्गीय विठ्ठल वाजे यांनीही सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते.

हेही वाचा : Bihar Election Results 2025। आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ; आरजेडी आणि भाजपमध्ये चुरस

The post ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! भाजपची रणनिती फळाला; ‘या’ जिल्ह्यात मोठी राजकीय उलधापालथ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!