“महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही”; इंदुरीकरांच्या सपोर्टसाठी डॅशिंग महिला नेत्याची पोस्ट चर्चेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Rupali Thombre Patil Post : किर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे इंदुरीकर महाराज त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून ट्रोल झाले होते. संगमनेर येथील एका लॅान्समध्ये त्यांच्या मुलीचा शाही साखरपुडा सोहळा मोठ्या थाट्यात पार पडला. यानंतर साखरपुडा सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि महाराजांच्या जुन्या सल्लाची आठवण ट्रोलर्सनी करून दिली.

लोकांना किर्तनातून साध्या पद्धतीने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराज यांना त्यांच्याच मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सोहळ्यावर इंदुरीकर महाराज यांनी स्पष्टीकरण दिले पण त्यानंतरही ट्रोलर्स थांबले नाहीत.

इंदुरीकर महाराज यांच्या नव्या किर्तनाचा एक व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओत महाराजांनी किर्तन करणे सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढच्या काही दिवसात व्हिडीओ टाकणार असल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयाला एका डॅशिंग राजकीय महिला नेत्याने पोस्टद्वारे असे न करण्याची विनंती केली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन, भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री, पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसेत्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे .फेटा खाली ठेवायचा नाही, असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदुरीकर महाराज यांना फेसबुक पोस्टद्वारे विनंती केली आहे.

….त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे.

सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झाले असून, आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत. माझ्यापर्यंत ठीक होते… पण आता माझ्या मुलीला पण बोलले जात आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलले जात आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळते, असे त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना महाराजांनी सुनावले आहे. मी पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एक क्लिप टाकणार आहे, असे देखील इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 2026 Mega Releases: 2026 बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज वर्ष!

The post “महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही”; इंदुरीकरांच्या सपोर्टसाठी डॅशिंग महिला नेत्याची पोस्ट चर्चेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!