
satara news: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजनेसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
ई-केवायसी अत्यंत सोपी असून स्वतः महिला आपल्या मोबाईलवरुन देखील करु शकते. ई-केवायसी करताना प्रथम महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणीकरण करावे. तदनंतर पती, वडील यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी या कालावधीत ई-केवायसी केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी.
योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांची पती, वडील दोन्हीही मयत आहेत, किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मयत आहेत, तसेच विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या महिला यांचे ई-केवायसीबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. परंतु तत्पूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेच आधार कार्ड प्रमाणीत करुन अपूर्ण ई-केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेण्याबाबत शासनामार्फत स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले आहे.
The post satara news: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











