बिहारचा सुरुवातीचा कल भाजपच्या बाजूने; कोण आघाडीवर?

Bihar Elections 2025 |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Elections 2025 | बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा अंतिम निकाल शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता झाली आहे.

नियमानुसार, सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची अर्थात टपाल मतपत्रिकांची गणना सुरू आहे. त्यानंतर, ठीक सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू करण्यात येणार आहे.

त्यानुसार आता बिहारचा पहिला कल भाजपच्या बाजूनं लागल्याचे दिसत आहे. भाजप आणि राजद यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे एनडीए ७० तर महाआघाडी ४३ जागांवर आघाडीवर आहे. पण भाजप आणि राजद यांच्यात मात्र चुरस निर्माण झाली आहे.

यानुसार आता पोस्टल मतमोजणी संपली असून आता ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात होत आहे. त्यानुसार आता मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे सत्ता कुणाकडे जाणार हे निश्चित होईल.

मोकामामधून अनंत सिंह, अलीपुरमधून मैथिली ठाकूर आघडीवर आहेत. तर राघोपुरमधून तेजस्वी यादव आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.  याशिवाय तेजप्रताप यादव पिछाडीवर आहे.

The post बिहारचा सुरुवातीचा कल भाजपच्या बाजूने; कोण आघाडीवर? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!