Bihar Election Results 2025 : पोस्टल मतमोजणी सुरू ; मैथिली ठाकूर-अनंत सिंह, तेजस्वी यादव आघाडीवर

Bihar Election Results 2025।
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election Results 2025। बिहारमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे आणि सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. राज्य सध्या एका मोठ्या राजकीय निर्णयाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान , पोस्टल मतमोजणीत  मैथिली ठाकूर-अनंत सिंह, तेजस्वी यादव आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार पाचव्यांदा विजय मिळवून इतिहास रचतील की यावेळी सत्ता परिवर्तन होईल.? दरम्यान ,पोस्टल बॅलेट मतांच्या मोजणीत, एनडीएला ६१, महाआघाडीला ३२ आणि इतरांना ६ जागा मिळत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या पोस्टल बॅलेट ट्रेंडमध्ये छपरामध्ये छोटी कुमारी आघाडीवर आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर असल्याचे दिसून येते.

महुआमध्ये तेज प्रताप यादव आघाडीवर Bihar Election Results 2025।
जनशक्ती जनता दल (जेडी) प्रमुख तेज प्रताप यादव महुआ विधानसभेच्या जागेवर आघाडीवर आहेत. त्यांचे भाऊ तेजस्वी यादव हेही राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

The post Bihar Election Results 2025 : पोस्टल मतमोजणी सुरू ; मैथिली ठाकूर-अनंत सिंह, तेजस्वी यादव आघाडीवर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!