
Bihar Election Result। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. भाजप आणि नितीशकुमारांचा जदयू यांची एनडीए सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील राजद, काँग्रेस यांची महागठबंधन सत्ता हस्तगत करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. नितीशकुमार बिहारचे नऊ वेळा मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांच्या सत्तेला राजदचे तेजस्वी यादव हादरे देण्यात यशस्वी ठरतात का हे आज निवडणूक निकालातून समजणार आहे.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झाले आहे. Bihar Election Result।
एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळालेला. नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी बिहारच्या भविष्यासाठी एक नवीन कहाणी लिहितील हे निवडणूक निकालांवरून ठरेल.
प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल. २४३ जागांपैकी १२२ जागांपैकी बहुमत आवश्यक आहे. मतमोजणी पाहता, प्रशासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोगानेही सर्व आवश्यक तयारी केली आहे.Bihar Election Result।
The post तेजस्वी की नितीश…?, बिहारमध्ये कुणाचं सरकार येणार ; थोड्याच वेळात मतमोजणीस होणार सुरुवात appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











