Bhor Politics : संग्राम थोपटेंनी साधला डाव; सकल मराठा समाजाच्या पाठिंब्याने भोरमध्ये भाजपची ताकद वाढली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील राजकीय समीकरणात महत्त्वाची हालचाल झाली आहे. सकल मराठा समाजाचे भोर तालुका अध्यक्ष संजय भाऊसाहेब भेलके (पाटील) यांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यात भाजपची ताकद लक्षणीय वाढल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.

संजय भाऊसाहेब भेलके (पाटील) यांच्यासोबत दिलीप किसन भेलके, सुरज राजेंद्र भेलके, सुनील भाऊसाहेब खाटपे, सयाजीराव पाटील आणि पार्थ संजय भेलके यांनी देखील भाजपचा झेंडा हातात घेतला. पक्षात प्रवेश करताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला, यावेळी सोबत युवा नेते पृथ्वीराज थोपटे, उद्योजक विक्रम चव्हाण, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव थोपटे,

सुभाषराव कोंढाळकर, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत अण्णा मळेकर, सामाजिक कार्यकर्ते बजरंग आबा शिंदे, विश्वजीत चव्हाण, रवि कंक, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अमर बुदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच याप्रसंगी आप्पा मळेकर, महेश भेलके,अभिदादा भेलके, जितेंद्र कंक, दीपक मांढरे, इंद्रजित सुपेकर आणि इतर कार्यकर्तेही सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळावर जयघोष, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचं वातावरण होते.

यावेळी संजय भेलके म्हणाले की, भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून समाजहितासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. संग्राम थोपटे यांनीही नव्या सदस्यांचे स्वागत करत सांगितले की, सकल मराठा समाजाचा पाठिंबा मिळणं ही पक्षासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या सहभागामुळे भोर तालुक्यातील विकासाच्या वाटचालीला नवसंजीवनी मिळेल.

पक्षाची ताकद वाढणार..
भेलके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे सकल मराठा समाजातील एकजूट भाजपच्या बाजूने दिसून आली आहे. भरतीय जनता पक्षाची ताकद वाढणार असून आगामी राजकीय घडामोडींवर या निर्णयाचा ठोस परिणाम होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

The post Bhor Politics : संग्राम थोपटेंनी साधला डाव; सकल मराठा समाजाच्या पाठिंब्याने भोरमध्ये भाजपची ताकद वाढली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!