Manchar News : मंचरमधील नागरी समस्यांचा मुद्दा गाजणार; सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 मध्ये सध्या सिमेंट रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली असून भाजी बाजार, मुक्ताई मंदिर परिसरापासून उजवा कॅनॉल, मोरडे कॅडबरी कारखाना परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच घोडेगाव रोड या भागात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या प्रभागांचा वेगाने झालेला विकास लक्षात घेतल्यास नगरपंचायतीने अनेक मूलभूत कामे उभी केली असली तरी लोकसंख्या वाढीमुळे उपलब्ध सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत.

नागरिकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नगरपंचायतीसमोर सर्वांना समान सुविधा पुरविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काही भागात पाणीपुरवठा वेळेवर न होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. काही भागात पहाटे अडीच ते तीन वाजताच नळाद्वारे पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी उठून पाणी साठवावे लागते. यामुळे महिलांना व वृद्धांना विशेषतः त्रास होत आहे.

काही सोसायट्यांनी स्वतःच्या बोरवेलद्वारे पाण्याची व्यवस्था केली असली, तरी उन्हाळ्याच्या दिवसात बोरवेल कोरड्या पडल्याने पुन्हा नगरपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाणीटंचाईसह ड्रेनेज, लाईट व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आदी बाबींबाबतही नागरिकांकडून सुधारणा मागणी केली जात आहे.

नगरपंचायतीने सध्या उपलब्ध संसाधनांच्या मर्यादेत विकासकामे केल्याचा दावा केला असला तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा अपुऱ्या पडत आहेत, हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रभागांतील पाणी, रस्ता व स्वच्छतेच्या प्रश्नांवर उमेदवार आणि पक्षांकडून ठोस भूमिका अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे.

The post Manchar News : मंचरमधील नागरी समस्यांचा मुद्दा गाजणार; सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!